Thursday, March 15, 2018


जलजागृती सप्ताहाचे आज उद्घाटन
नांदेड, दि. 15 :- नांदेड पाटबंधारे मंडळ नांदेड यांच्यावतीने जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते शुक्रवार 16 मार्च 2018 रोजी गोदावरी, पुर्णा, मानार, पैनगंगा, लेंडी, कयाधु, मांजरा या नद्याच्या पाण्याच्या कलश पुजनाने जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.
जलजागृती सप्ताहाचे आयोजन 16 ते 22 मार्च 2018 या कालावधीत साजरा करण्यात आले आहे. या दरम्यान लाभक्षेत्रात प्रत्येक गावात कार्यशाळा घेण्यात येऊन पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत जलजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रविवार 18 मार्च 2018 रोजी सकाळी 6.30 वा. महात्मा ज्योतीबा फुले यांचा पुतळा (आयटीआय) ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड अशी "जल दौड" घेण्यात येणार आहे. या जल दौडीत नागरिकांनी तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी भाग घ्यावा, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी केले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 48 तास मद्य विक्री बंद   नांदेड ,   दि.   22   एप्रिल  :-   लो कसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 26 एप्रिल...