Thursday, March 9, 2017

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या
राज्यस्तरीय पुरस्कारांचे आज नांदेडमध्ये वितरण
संत रविदास, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार
नांदेड, दि. 10 :- राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या संत रविदास पुरस्कार, पद्मश्री  कर्मवीर  दादासाहेब गायकवाड पुरस्कार आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार यांचे उद्या शनिवार 11 मार्च 2017 रोजी नांदेड येथे वितरण होणार आहे. पुरस्कारांचे वितरण राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते आणि वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर  यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे सकाळी 11 वा. वितरण सोहळा होणार आहे.
सोहळ्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहेत. सोहळ्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती मंगलाताई गुंडले, खासदार अशोकराव चव्हाण, खासदार राजीव सातव, खासदार डॉ. सुनिल गायकवाड, नांदेड शहराच्या महापौर श्रीमती शैलजा स्वामी, आमदार अमरनाथ राजुरकर, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार डी. पी. सावंत, आमदार वसंत चव्हाण, आमदार प्रदीप नाईक, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार सुभाष साबणे, आमदार सौ. अमिता अशोकराव चव्हाण, आमदार हेमंत पाटील , आमदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार डॉ. तुषार राठोड हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सचिव डॉ. सुरेंद्रकुमार बागडे आणि राज्याचे समाज कल्याण आयुक्त पीयूष सिंह यांनी केले आहे. निमंत्रितांनी कार्यक्रमाच्या वेळपुर्वी 15 मिनिटे आगोदर सभागृहात उपस्थित रहावे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिने हॅंडबॅग अथवा तत्सम वस्तू सोबत आणू नयेत , अशी विनंती संयोजकांच्यावतीने करण्यात आली आहे.  

000000
बंगळुरू येथे प्रादेशिक सेनाभरती
            नांदेड, दि. 9 :-  भारतीय प्रादेशिक सेनेतील भरतीसाठी  सोमवार 27 मार्च ते शुक्रवार 31 मार्च 2017 दरम्यान कर्नाटक राज्यामधील बंगळुरू येथे भरती शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
116 -इन्फन्ट्री  बटालियन प्रादेशिक सेना पॅरा  यांच्यातर्फे  प्रादेशिक सेना सैन्य  भरती रॅलीचे आयोजन पॅराशूट रेजीमेंट सेन्टर, जे. सी.  नगर बॅगलूरु येथे 27 मार्च ते  31 मार्च दरम्यान आयोजीत केले आहे.  ही सैन्य भरती   सोल्जर जीडी 42 पदे, सोल्जर क्लार्क स्टाफ डयुटीज एक पद, सोल्‍जर हाउसकीपर-एक पद व सोल्जर शेफ कम्युनिटी- दोन पदे  यासाठी आहे. 
वयोमर्यादा 18 ते 42 वर्षे आहे.   शैक्षणीक पात्रता - सोल्जर जी डी- 10 वी उत्तीर्ण 45 टक्के गुण  व प्रत्येक विषयात 33 टक्के किंवा 12 वी उत्तीर्ण. सोल्जर क्लार्क 12 वी उत्तीर्ण  50 टक्के गुण  प्रत्येक विषयात 40 टक्के गुण किंवा पदवी. सोल्‍जर हाउसकिपर – 8 वी उत्तीर्ण.  सोल्जर शेफ कम्युनिटी- 10 वी उत्तीर्ण व या ट्रेडमधे कामाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.  शारिरीक पात्रता -  उंची  160 सेमी, वजन 50 कि. ग्रॅ., छाती  77 सेमी  व फूगवून 82 सेमी.  अधिक माहितीसाठी  व पात्रता जाहिरात पहाण्यासाठी जिल्हा  सैनिक कल्याण   कार्यालय नांदेड  येथे  संपर्क करावा , असे  आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी   मेजर  व्ही. व्ही. पटवारी यांनी  केले आहे.

0000000
  माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक मदतीसाठी
31 मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 9 :- माजी सैनिक, विधवांच्या ( हवालदार पदापर्यत )  दोन पाल्यासाठी  12 हजार रुपये प्रमाणे जे पाल्य इयत्ता पहिली ते बारावीमध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या तारखेमध्ये केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्याकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या माजी सैनिक, विधवांनी आपल्या पाल्यांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरले नाहीत अशा सर्व माजी सैनिक, विधवांनी शुक्रवार  31 मार्च 2017 पर्यत ऑनलाईन अर्ज सादर करावेत.   
जे माजी सैनिक, विधवा पेनुरी मदतीसाठी पात्र आहेत त्यांनी आपले ऑनलाईन अर्ज शुक्रवार 31 मार्च 2017 पर्यत सादर करावे. ज्या माजी सैनिक, विधवांनी www.ksb.gov.in या संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंदणी केली नाही त्यांनी नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क करावा , असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर व्ही. व्ही. पटवारी यांनी केले आहे.

0000000
सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा दौरा
नांदेड, दि. 9 :- राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे हे शनिवारी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 11 मार्च 2017 रोजी पुणे येथून पनवेल-नांदेड रेल्वेने सकाळी 9.25 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9.35 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.45 वा. शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे आगमन . सकाळी 11 वा. सामाजिक न्याय विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड व संत रोहिदास राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार नांदेड येथून शासकीय वाहनाने लातूरकडे प्रयाण करतील.

000000