Saturday, March 4, 2017

जि. प. अध्यक्ष , उपाध्यक्ष निवडीसाठी
21 मार्चला विशेष सभा
पं. स. सभापती , उपसभापती निवड 14 मार्चला
नांदेड दि. 4 :- जिल्‍हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 पार पडल्‍यानंतर   नांदेड जिल्‍हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक मंगळवार 21 मार्च 2017 रोजी तर जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक मंगळवार 14 मार्च 2017 रोजी होणार असल्याचे जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी कळविले आहे.
 याबाबत निवडणूक विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या प्रगटनात म्हटले आहे की, जिल्‍हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 पार पडल्‍यानंतर   जिल्‍हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणामधून निवडून आलेल्‍या सदस्‍यांची नावे राज्‍य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यापुर्वीच 28 फेब्रुवारी 2017 रोजी शासन राजपत्रात प्रसिध्‍द करण्‍यात आल आहे.
जिल्‍हा परिषद नांदेडच्‍या अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष पदाची निवड करुन जिल्‍हा परिषदेचे गठन करण्‍याकरीता  जिल्‍हा परिषदेची पहिली विशेष सभा दि. 21 मार्च 2017 रोजी कै. यशवंतराव चव्‍हाण सभागृह, जिल्‍हा परिषद नांदेड येथे आयोजित करण्‍यात आलेली असन त्‍यासंबंधीच्‍या नोटीसा जिल्‍हा परिषदेच्‍या नवनिर्वाचित सदस्‍यांना  पिठासीन अधिकारी यांचेकडून निर्गमित होतील.
तसेच पंचायत समितीच्‍या सभापती व उपसभापती पदाची निवड करुन पंचायत समितीचे गठन करण्‍याकरीता जिल्‍हयातील सर्व पंचायत समित्‍यांची पहिली विशेष सभा मंगळवार 14 मार्च 2017 रोजी आयोजित करण्‍यात आलेली असून त्‍यासंबंधीच्‍या नोटीसा सर्वसंबंधित पिठासन अधिकारी यांचेकडून  पंचायत समितीच्‍या नवनिर्वाचित सदस्‍यांना निर्गमित होतील. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठीच्या या निवडणुकीसाठी संबंधीतांना या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 12 यावेळेत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार आहेत. त्यानंतर दुपारी 2 वा. निवडीसाठीच्या विशेष सभा होणार आहेत.
पंचायत समितीच्‍या नवनिर्वाचित सभापती यांना मंगळवार 21 मार्च 2017 रोजी आयोजित करण्‍यात आलेल्‍या जिल्‍हा परिषदेच्‍या पहिल्‍या विशेष सभेच्‍या नोटीसा मंगळवार 14 मार्च 2017 रोजीच संबंधित पिठासीन अधिकारी यांचेकडून देण्‍यात येतील.त्‍याप्रमाणे त्‍यांना मंगळवार 21 मार्च 2017 रोजीच्‍या विशेष सभेस उपस्थित राहण्‍याचा अधिकार आहे. तथापि त्‍यांना मतदान प्रकियेत भाग घेता येणार नाही. 
पंचायत समितीच्‍या तसेच जिल्‍हा परिषदेच्‍या पहिल्‍या विशेष सभेस पिठासीन अधिकारी यांचेकडून निर्गमित होणा-या विशेष सभेच्‍या नोटीसीच्‍या अनुषंगाने विशेष सभेस  सर्व संबंधित नवनिर्वाचित सदस्‍यांनी  उपस्थित रहावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...