Thursday, March 9, 2017

  माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक मदतीसाठी
31 मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 9 :- माजी सैनिक, विधवांच्या ( हवालदार पदापर्यत )  दोन पाल्यासाठी  12 हजार रुपये प्रमाणे जे पाल्य इयत्ता पहिली ते बारावीमध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या तारखेमध्ये केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्याकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या माजी सैनिक, विधवांनी आपल्या पाल्यांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरले नाहीत अशा सर्व माजी सैनिक, विधवांनी शुक्रवार  31 मार्च 2017 पर्यत ऑनलाईन अर्ज सादर करावेत.   
जे माजी सैनिक, विधवा पेनुरी मदतीसाठी पात्र आहेत त्यांनी आपले ऑनलाईन अर्ज शुक्रवार 31 मार्च 2017 पर्यत सादर करावे. ज्या माजी सैनिक, विधवांनी www.ksb.gov.in या संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंदणी केली नाही त्यांनी नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क करावा , असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर व्ही. व्ही. पटवारी यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

 मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा निवडणुकीतील उमेदवार श्री. अविनाश भोसीकर याच्या आक्षेपा संदर्भातील खुलासा. माध्यमांच्या संदर्भासाठी....