Monday, February 27, 2017

आदिवासी क्षेत्रातील शिक्षकांचे
नेत्र विषयक प्रशिक्षण संपन्न
नांदेड, दि. 27 पजिल्हा रुग्णालय  गोकुंदा येथे 21 व 22 फेब्रुवारी रोजी शासनाच्या दृष्टीदान योजने अंतर्गत  शिक्षकांच्या प्राथमिक दृष्टी तपासणी प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय नांदेड यांचे मार्फत घेण्यात आला. या प्रशिक्षणात शालेय स्तरावर विद्यार्थ्याची दृष्टी तपासून अंशतः ज्या विद्यार्थ्याची दृष्टी कमी आहे त्यांना संदर्भीत करण्याचे प्रत्याक्षित दाखवून शिक्षकांकडून प्रत्याक्षित करून घेण्यात आले व त्याचा सराव ही करून घेण्यात आला.
शिक्षकांना आवश्यक साहित्य उदा E-chart, मोजपट्ठी टेप, रजिस्टर, संदर्भित करावयाचे कार्ड, पेन इत्यादीचे फोल्डर देण्यात आले. जेणे करून शिक्षकांना काम करताना सोयीचे होईल. ज्या विद्यार्थ्याची दृष्टी कमी आहे त्यांना शालेयस्तरावरच तपासून  संदर्भीत करण्यात येईल म्हणजे त्यांचा नेत्रविकार दूर होऊन विद्यार्थ्याची दृष्टी कायम उत्तम राहील व अभ्यासात प्रगती होईल. संदर्भीत विद्यार्थ्याना आवश्यक उपचार शासकीय स्तरावर राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत देण्यात येतील व त्यांचा नेत्रविकार दूर होईल.या प्रशिक्षण आदिवासी भागातील 84 शिक्षकांना ( किनवट व माहूर ) देण्यात आले, ज्या शिक्षकांचे प्रशिक्षण झाले आहे ते शिक्षक त्यांचा शाळेतील इतर शिक्षकांना प्रशिक्षित करणार आहेत.
         या कार्यक्रमासाठी नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.पी.कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ गुंटूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. इंगळे, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. सिरसीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेत्रतज्ज्ञ डॉ. उंचेगावकर, डॉ. बंद्रेवार, नेत्र चिकित्सा अधिकारी विवेक दिक्षित, राहुल गोरे, विशाल साळवे व गजानन टेकाळे यांनी परिश्रम घेतले.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...