Thursday, February 9, 2017

हत्तीरोग उच्चाटनासाठी आजपासून
जिल्ह्यात सामुहिक औषधोपचार मोहीम
गृहभेटीत गोळ्या खाऊ घालण्यात येणार
नांदेड दि. 9 :- महाराष्ट्रात नागपूर, नांदेड, चंद्रपूर, ठाणे, भंडारा,  सोलापूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली इत्यादी जिल्ह्यात हत्तीरोगाचे रुग्ण आजही आढळतात. या हत्तीरोगाचे 2020 पर्यंत उच्चाटन करण्याचे निर्धारीत करण्यात आले आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी एकदिवसीय सामुहिक औषधोपचार मोहीम नांदेड जिल्ह्यात शुक्रवार 10 ते मंगळवार 14 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात 10, 11  व 12 फेब्रुवारी 2017 या तीन दिवसात, तर शहरी व मनपा निवडक भागात दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी 2017 दरम्यान औषधोपचार मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील एकूण 34 लाख 82 हजार 628 लोकसंख्या पैकी 29 लाख 90 हजार 793 लोकसंख्या निवडलेली आहे. त्यात एकूण अपेक्षित लाभार्थी 27 लाख 81 हजार 437  आहेत. यात शुन्य ते 2 वर्षाचे बालके, गरोदर माता व गंभीर रुग्णांना वगळण्यात आले आहे. ही लोकसंख्या नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व मनपा नांदेड शहरातील हडको, सिडको वाघाळा व तरोडा खु, व तरोडा बु. परिसराचा समावेश करण्यात आला आहे.
ही मोहिम संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यासाठी 1 हजार 833 टिम (2 कर्मचाऱ्यांची एक टिम) तयार करण्यात आल्या आहेत. त्यावर 183 पर्यवेक्षक, 19 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व 11 जिल्हास्तरीय अधिकारी पाहणी करणार आहेत. तेंव्हा डी. ई. सी. अधिक ॲलबेनडॉझॉल गोळ्या खाऊ घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर व स्वयंसेवक वरील तारखांना येतील तेंव्हा या गोळ्या जेवन करुन ( उपाशी पोटी न घेता ) घेऊन या मोहिमेस प्रतिसाद द्यावा व हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी सर्वांना हातभार लावावा, असे आवाहन हिवताप अधिकारी डॅा. राजेंद्र पवार यांनी केले आहे.  

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...