Monday, February 27, 2017

केळी पीक संरक्षणासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 27 :- मुदखेड अर्धापूर तालुक्यातील केळी  पिकासाठी  किड    रोग सर्वेक्षण प्रकल्पांतर्गत केळी पिकावरील किड  रोगाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याआधारे केळी पिक संरक्षणासाठी पुढील प्रमाणे कृषि  संदेश देण्यात आला आहे .
केळीच्या पानावर रोगाचा प्रादुर्भाव आकाराने जास्त असेल तर त्याचा परिणाम प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर होत असल्याने जास्तीत जास्त पाने  कार्यरत ठेवण्यासाठी फक्त पानाचा रोगग्रस्त भाग काढुन बागेबाहेर नेऊन नष्ट करावा. पानावरील लहान-लहान तपकिरी ठिपके वाढ एकत्र होतात. मोठा  ठिपका होऊन पानाचा जास्त भाग रोगग्रस्त होतो. त्यासाठी झाडावर प्रोपिकोनेझॉल 0.05 टक्के (0.5मि.ली) मिनरल ऑईल 1 टक्के (10 मि.ली) प्रति लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी,  असे आवाहन नांदेडचे उप विभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्‍त क्र. 344   उष्माघातापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी शाळा ,   महाविद्यालयांनी उपाययोजना करण्यात : जिल्हाधिकारी नांदेड दि....