Friday, February 3, 2017

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात
विवारी रंजन कोळंबे यांचे व्याख्यान
नांदेड दि. 3 :-  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवार 5 फेब्रुवारी 2017 रोजी एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे करण्यात आले आहे.
सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेमध्ये होणा-या या शिबिरामध्ये पुणे येथील अर्थशास्त्र या विषयाचे ख्यातनाम वक्ते रंजन कोळंबे हे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील अर्थशास्त्र स्पर्धा परिक्षातंत्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचे द्घाटन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांचे हस्ते होणार आहे. मनपा आयुक्त समीर उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी या महत्वपूर्ण अशा शिबिरामध्ये नोटबुकसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, मनपा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेले आहे.

00000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...