Monday, January 2, 2017

डिजीटल पेमेंटबाबत जनजागृती करा,
व्यवहारात आवर्जून वापर करा - काकाणी
शासकीय अधिकाऱ्यांसाठीचे कॅशलेस प्रशिक्षण संपन्न
नांदेड, दि. 2 :- डिजीटल पेमेंटचा वापराबाबत नागरिकांपर्यंत पोहचून माहिती द्या, तसेच शासकीय व्यवहारात डिजीटल पेमेंटचा आवर्जून वापर करा,
असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिले. जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी डिजीटल पेमेंट विषयी प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. या प्रशिक्षणात श्री. काकाणी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील बचत भवन येथे प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, कोषागर अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे यांची उपस्थिती होती. अग्रणी बँकेचे जयंत वरणकर, श्री. सोनावणे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे रोकडरहित- डिजीटल पेमेंटबाबत माहिती दिली.
प्रशिक्षणात वैयक्तीक पातळीवरील डिजीटल पेमेंट, शासकीय व्यवहारातील वापर, तसेच त्रयस्थांचे पेमेंट आदीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी डिजीटल पेमेंटच्या व्यवहारांची यापुढील काळातील गरज आणि वेळेत बचत, पारदर्शकता या अंगाने मांडणी केली. 
इंटरनेटचे व्यापक जाळे, मोबाईल बँकीग, मोबाईल वॅलेट, ई-वॅलेटबाबतही प्रशिक्षणात माहिती देण्यात आली. अप्पर कोषागार अधिकारी श्री. पाचंगे यांनी सुत्रसंचालन केले. कोषागार अधिकारी श्री. गग्गड यांनी आभार मानले. प्रशिक्षणास विविध शासकीय कार्यालयांचे आहरण व संवितरण अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******

No comments:

Post a Comment

  वृत्‍त क्र. 344   उष्माघातापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी शाळा ,   महाविद्यालयांनी उपाययोजना करण्यात : जिल्हाधिकारी नांदेड दि....