Thursday, October 6, 2016

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा

नांदेड, दि. 6 :-  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार 7 ऑक्टोंबर 2016 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील .
शुक्रवार 7 ऑक्टोंबर 2016 रोजी हिंगोली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदान हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने सायंकाळी  5.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व सायंकाळी 5.35 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
0000000


आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त
वृद्धाश्रमात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

नांदेड, दि. 6 :- जिल्हा रुग्णालय नांदेड अंतर्गत राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमामार्फत 5 ऑक्टोंबर रोजी मालेगाव रोड गजानन महाराज मंदिर जवळील संध्या छाया या वृद्धाश्रमात आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित ज्येष्ठ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना वैयक्तिक आरोग्य व स्वच्छतेबाबत समुपदेशनपर मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विजय कंदेवाड, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच आर गुंटूरकर व वृद्धाश्रम अध्यक्ष डॉ. पाटोदेकर यांची उपस्थिती होती. तसेच आज श्री स्वामी समर्थ मंदिर रयत रुग्णालयाजवळ ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी तपासणी शिबीर घेण्यात आले. या  शिबिरामध्ये 111 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात मधुमेहाचे 8 रुग्ण व उच्चरक्तदाबाचे 13 व मोतीबिंदुची 8 रुग्ण आढळून आली आहेत. शिबिरास जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, नेत्र चिकित्सक डॉ. विवेक दिक्षित, जिल्हा कार्यक्रम समन्वयक  डॉ. प्रदीप बोरसे, सर्व एनसीडी कार्यक्रम कर्मचारी यांनी योगदान दिले.

0000000