Saturday, December 3, 2016

जागतिक अपंग दिनानिमित्त
कायदेविषयक शिबीर संपन्न
नांदेड दि. 3 :-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे  निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड येथे आज जागतिक अपंग दिनानिमित्त कायदेविषयक शिबीर संपन्न झाले.
यावेळी न्या.. आर. कुरेशी यांनी विकलांगांच्या विविध कायद्याबाबत माहिती दिली. तसेच पाचशे एक हजार रूपयांच्या नोटा बंद झाल्यामुळे काही समाजकंटक गैरफायदा घेत असून त्यांच्या कुठल्याही भुलथापांना बळी पडता स्वत:च्या बॅंक खात्याची माहिती गैरव्यक्तीस देवू नका असे सांगीतले.  
            तत्पुर्वी अतिरिक्त सह दिवाणी न्यायाधीश न्या. एस. डी. तारे, अॅड. राणा सारडा, अॅड. प्रविण अयाचित, अॅड. एम. एल. गायकवाड, अॅड. एम. डी. वाकोडकर यांनी विविध कायद्यांची माहिती दिली. विधी सेवा प्राधिकरण नांदेड गुरूद्वारा लंगर साहिबचे बाबा अमरजितसिंघ यांनी गुरूद्वाराच्यावतीने येथील अंध विद्यार्थ्यांना फळे खाऊचे वाटप केले.
यावेळी संस्थेचे सदस्य नागेशगुट्टे, सत्यश्री गुट्टे, अॅड. विशाखा जाधव, शाळेचे मुख्याध्यापक एस. पी. पाटील, बलभी केंद्रे, संगीत शिक्षक पी. व्ही. सिरभाते, आर. एल. जोजार, एस. एन. होळंबे, भास्कर आनेराये, अधिक्षक मनोजकुमार कलवले, सहशिक्षिका व्ही.एस.निलम यांची उपस्थिती होती.
शाळेच्या अंध विद्यार्थी यश गायकवाड, अंकुश खंडेलोटे, कु.दीपाली गे, शिवाणी भूतनर यांनी गीत गायनातून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.  तिरूपती गायकवाड याने ब्रेललिपीचे इंग्रजीमध्ये वाचन करून इंग्रजीमध्ये भाषण केले. या विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून मान्यवरांनी कौतुक करून प्रोत्साहनपर बक्षिस दिले.  सुत्रसंचलन व्ही. एस. निलक यांनी केले. आभार मुख्याध्यापक एस. पी. पाटील यांनी मानले.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 283

  वृत्त क्र.   283 निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ; खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गं...