Friday, November 18, 2016

माजी सैनिक, कुटुंबासाठी पुनर्वसनाच्या
विविध योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन  
नांदेड दि. 18 :- पुनर्वसन व कल्याण विभाग सरंक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्यावतीने युद्ध विधवा, युद्धात अपंगत्व आलेले माजी सैनिक व सैन्य सेवेत असताना शहीद पावलेल्या जवानांच्या विधवा पाल्यांसाठी विविध योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
यामध्ये मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी 7 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत, मुलीच्या विवाहासाठी 1 लाख रुपये, अपंग माजी सैनिकांसाठी मोडीफाईड स्कूटर खरेदीसाठी 70 हजार रुपये व अनाथ मुलांसाठी 1 लाख रुपये आर्थिक मदतीच्या योजना जाहीर झाल्या आहेत. यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र माजी सैनिक, विधवा यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे भेट देवून या योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन मेजर मिलींद तुंगार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  विशेष लेख :   महिला आणि मतदान ;  संघर्षातून मिळालेला मताधिकार हक्काने वापरा !   जगामध्ये लोकशाहीच्या व मतदानाच्या इतिहासात आपण डोक...