Wednesday, September 14, 2016

तृतीयपंथीसाठी कायदेविषयक शिबीर संपन्न
           नांदेड, दि. 14 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड कार्यालयामार्फत नुकताच रेल्वे स्टेशन नांदेड येथील आरपीएफच्या कार्यालयात तृतियपंथी यांच्या कायदेविषयक समस्या व त्यावरील उपाय या विषयावरील कायदे विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  
अध्यक्षस्थानी  न्या. ए. आर. कुरेशी होते. न्या. कुरेशी यांनी समाजातील घटक असलेल्या या व्यक्तींना समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार आपल्या राज्यघटनेत असून समाजाने त्यांना सन्मानाची वागणुक दिली पाहिजे. आजच्या तृतियपंथी यांची संख्या अल्प असल्यामुळे त्यांच्या विविध अडचणी दूर करण्यासाठी संघटीत होणे गरजेचे आहे. इतरांना त्रास होईल अशी कृत्ये न करता  त्यांनी गावोगावी फिरत न रहाता शिकले पाहिजे, काम केले पाहिजे व सन्मानाने जगले पाहिजे. सामान्यांनी त्यांना चांगली वागणूक देवून त्यांना आपल्या प्रवाहात सामावून घेतले पाहिजे, असे सांगीतले. तसेच यावेळी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजनाची माहिती दिली. 
            तत्पुर्वी जिल्हा न्यायालय नांदेड येथील न्या. जे. आर. पठाण यांनी पर्यायी वाद निवारण पध्दती आणि त्यांचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. अॅड. प्रविण अयाचित यांनी तृतियपंथी यांच्या विधी समस्या व त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन केले. अॅड. वाकोडकर यांनी नागरीकांचे मुलभुत कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले. रेल्वे पोलीस (जीआरपी) चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  श्री. अत्तार व अॅड. श्रीमती झगडे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. यावेळी रेल्वे सुरक्षाबलचे पोलीस निरिक्षक श्री. यादव, अॅड. श्रीमती घोरपडे यांची उपस्थिती होती.
            गौरी शानूर बल्कस यांनीही मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन अॅड. श्री वाकोडकर यांनी केले तर आभार अॅड. प्रविण अयाचित यांनी मानले.  विधी सेवाचे संगमेश्वर मंडगे,  रेल्वे पोलीस कर्मचारी यांनी कार्यक्रम संयोजन केले.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...