Thursday, September 8, 2016

ठिबक, तुषार संच बसविण्यासाठी
अर्ज करण्याची 6 ऑक्टोंबर पर्यंत मुदत
        नांदेड, दि. 8 :- प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजने अंतर्गत (PMKSY) केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन येाजना सन 2016-17 साठी सुक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी अर्ज ऑनलाईन www.mahaagri.gov.in www.mahaethibak.gov.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहे. शेतक-यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन भरलेल्या अर्जांची एक प्रत सातबारा उतारा, 8-  उतारा, आरटीजीएसची सुविधा असलेल्या बँकेतील खाते पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्ससह संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात गुरुवार 6 ऑक्टोंबर 2016 पर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
या कार्यक्रमातंर्गत अवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प अत्यल्प भुधारकासाठी 60 टक्के सर्वसाधारण भुधारकांसाठी 45 टक्के तर अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प अत्यल्प भुधारकासाठी 45 टक्के सर्वसाधारण भुधारकासाठी 35 टक्के अनुदान देय आहे. या योजने अंतर्गत सर्व पिकांचा समावेश करण्यात आला आहे. ऊस, कापुस यासारखी सर्व नगदी पिके, केळी, द्राक्षे, डाळींब यासारखी सर्व फळपिके, याशिवाय सर्व कडधान्य, तृणधान्य, गळीत पिके तसेच हळद, आले इत्यादी पिकांसाठी या योजने अंतर्गत शेतक-यांना सर्व प्रकारच्या सुक्ष्म सिंचन पध्दतीला अनुदान अनुज्ञेय आहे. दिनांक 6 ऑक्टोंबर 2016 पर्यंत अर्ज ऑनलाईन केले नाही ठिबक / तुषार संच बसविले तर या संचास नवीन मार्गदर्शक सुचनान्वये अनुदान दिले जाणार नाही.

0000000

No comments:

Post a Comment

 शासकीय लेखनसामुग्री व ग्रंथागार 22 ते 26 एप्रिल या कालावधीत बंद छत्रपती संभाजीनगर, दि. 18 (विमाका): शासकीय लेखनसामुग्री व ग्रंथागार, छत्रपत...