Saturday, September 3, 2016

अनुसूचित जमाती विकास योजनाच्या लाभासाठी  
प्रस्ताव पाठविण्याची 15 सप्टेंबर पर्यंत मुदत
नांदेड, दि. 3 :- सन 2016-17 या वर्षामधील ओटीएसपी  योजनेअंतर्गत नवीन विहीर इतर बाब घटकाचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव आवश्यक सर्व कागदपत्रासह सबंधीत तालुक्यातील गटविकास अधिकारी कार्यालयास गुरुवार 15 सप्टेंबर 2016 अखेर पर्यंत पाठविण्यात यावेत.
प्रस्तावासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे. लाभार्थ्याचा योजनेचा लाभ मिळणे बाबत विनंती अर्ज. अर्जात कोणत्या बाबीचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत याचा उल्लेख असावा. जसे नवीन विहीर  किंवा इतर बाब. संबंधीत तालुक्याचे तहसिलदार यांनी दिलेले सन 2015-16 यावर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र.  लाभधारकाच्या शेत जमीनीचा चालु वर्षाचा सातबाराची प्रत, जमिनीचा टोच नकाशाची प्रत 8-अ, लाभधारकाच्या प्रस्तावा सोबत सन 2002 च्या सर्वेक्षणानुसार दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नाव समाविष्ट  असल्याबाबत संबंधित लाभार्थ्याचे दारिद्रयरेषेचा यादी क्रमांक उल्लेख असलेले गट विकास अधिकारी यांचे मुळ प्रमाणपत्र. योजनेत अथवा इतर योजनेत नवीन विहिर घटकाचा लाभ घेतला नसल्या बाबतचे कृषि अधिकारी  (विघयो) यांचे  प्रमाणपत्र, गट विकास  अधिकारी यांचे प्रतिस्वाक्षरीसह (मुळ), लोकसंख्या नियंत्रण धोरणानुसार 1 मे 2001 नंतर देान पेक्षा जास्त आपत्य नसल्याबाबत संबंधित गावाच्या  ग्रामसेवकाचे विहित  नमुन्यात मुळ प्रमाणपत्र. जात प्रमाणपत्राची साक्षांकित छायांकित प्रत. नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणारे प्रस्तावधारकासाठी संबंधीत गट नंबरमध्ये विहीर नसल्याचे तलाठी यांचे मुळ प्रमाणपत्र, नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणाऱ्या प्रस्तावधारकासाठी इतर योजनेतून जसे एमआरईजीएस, जवाहर विहीर योजना  विहिरीसाठी लाभार्थ्याची निवड करण्यात आली नसल्याबाबतचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र.अर्जदार शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसल्याबाबत ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी  योजनामध्ये ज्या लाभार्थींनी विहिरी घेतल्या आहेत त्या यशस्वी झालेल्या आहेत अशा पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राधान्याने इतर बाबीसाठी  (मोटार,पाईपलाईन इतर अनुषंगीक) मागवावेत. ग्रामसभेचा निवड करणे बाबतचा ठराव. रेशनकार्डची सत्यप्रत प्रस्तावासोबत सादर करावी. संयुक्त खातेदार असल्यास कुटुंबात एकुण जमीन धारणाचे प्रमाणपत्र. सरपंच ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी यांनी दिलेले रहिवाशी प्रमाणपत्र. मतदान ओळखपत्र आधार कार्डाची झेरॉक्स. कृषि अधिकारी (विघयो) यांचा स्थळ पाहणी अहवाल.योजनेच्या मार्गदर्शक सुचनेमधे दिलेल्या विविध प्रपत्रानुसार माहिती जोडावी.
लाभार्थी निवडीचे अटी व शर्ती पुढील प्रमाणे राहतील. लाभार्थी   हा अनुसूचित जातीचा असावा. लाभधारकाचे नावे विघयो अंतर्गत किमान 0.40 हेक्टर  कमाल 6.0 हेक्टर मर्यादेपर्यंत शेत जमीन लाभधारकाचे नावे असणे आवश्यक आहे. लाभधारकाचे सन 2015-16 या वर्षाचे आर्थिक उत्पन्न 25 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. दारिद्रयरेषेखालील (बीपीएल) शेतक-यांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेची अट राहणार नाही. विघयो  योजनेसाठी लाभधारकांचे नाव सन 2002 च्या सर्वेक्षणानुसार दारिद्रयरेषेच्या  यादीमध्ये समाविष्ट असणे आवश्यक आहे. लाभधारकास 1 मे 2001 नंतर दोन पेक्षा जास्त  अपत्य झालेले नसावे. लाभधारकाची यापुर्वी विघयोयोजनेत निवड झाली असल्यास लाभ घेतला असल्यास तसेच जवाहर इतर विहिरीच्या योजनेचा लाभ घेतलेला असल्यास संबंधित लाभार्थी चालू वर्षी  निवडीसाठी अपात्र राहील. मार्गदर्शक सुचनाप्रमाणे  प्रस्तावधारकाकडे असलेल्या क्षेत्र धारणेनुसार निवड यादीमध्ये प्राधान्यक्रम देण्यात येईल. दोन हेक्टर पर्यंत क्षेत्र असल्यास प्रथम प्राधान्य, 2 ते 4 हेक्टर क्षेत्र  असल्यास द्वितीय प्राधान्य 4 ते 6 हेक्टर क्षेत्र असल्यास तृतीय प्राधान्य  याक्रमाने  यादी तयार  करण्यात येईल. त्यामधून जिल्हयासाठी ठरविण्यात आलेला लक्षांक 200  लाभार्थीच्या मर्यादेत लाभधारकाची निवड करण्यात येईल. यापुर्वी योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी निवडीस पात्र राहणार नाहीत. प्रस्तावासोबत जोडण्यात येणारी सर्व कागदपत्रे साक्षांकित करुनच जोडावीत, अन्यथा अर्ज अपात्र होईल.
सन 2011 च्या जनगणनेनुसार तालुक्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या प्रमाणात अनु.जमातीच्या लोकसंख्येवर आधारीत लाभार्थी निवडीचे उददीष्ट दर्शविणारा तक्ता (अनु.जमाती)
अं.क्रं.
तालुका
                                  अनु.जमाती
अनुसूचीत जमातीची लोकसंख्या
अनुसूचीत जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी
सन 2016-17 करिता अनुसूचीत जमातीचे (ओटिएसपी) लाभार्थी निवडीचे उददीष्ट
1
नांदेड
14786
5.25
10
2
मुदखेड
.4893
1.74
03
3
अर्धापूर
3915
1.39
03
4
बिलोली
16572
5.88
12
5
धर्माबाद
14497
5.15
10
6
नायगांव
9596
3.41
07
7
मुखेड
18727
6.65
13
8
कंधार
7314
2.60
05
9
लोहा
3821
1.36
03
10
हदगांव
30347
10.77
21
11
हिमायतनगर
18533
6.58
13
12
भोकर
26186
9.29
19
13
उमरी
9432
3.35
07
14
देगलुर
16374
5.81
12
15
किनवट
71896
25.52
51
16
माहुर
14806
5.25
11
एकुण
281695
100.00
200

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...